एरंडोल तालुक्यातील खडके सिम येथे एरंडोल-कासोदा रस्त्यालगत अंजनी धरणाच्या जलसाठा परीसरात सुमारे १० एकर क्षेञात आजुबाजूला तूर आणी मका माञ मध्यभागी गांजाची शेती असल्याचे उघडकीस आले आहे. एरंडोल शहरापासून सुमारे ७ कि.मी अंतरावर राज्य महामार्गालगत ही गांजाची शेती आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

रहदारी महामार्गालगत गांजाची शेती होत असल्याची माहीती पुढे आल्याने नागरीकांमध्ये आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दरम्यान गूरूवारी राञी या शेतात पोलिस गस्तीवर होते. खडके सीम येथे नितीश डिगंबर पाटील व सिध्दार्थ डिगंबर पाटील या दोन्ही भावांची सामायीक शेतजमीन असून ती शेती पावरा आदीवासी करीत होता. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे त्यांच्या सहकार्यांसह शेतावर पोहोचल्यामुळे चौकशी होत असतांना पावरा आपल्या परीवारासह पलायन करण्यात यशस्वी झालेला असून शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून शेतावरील गांजाच्या पिकाचा पंचनामा सूरू करण्यात आला. पंचनामा संध्याकाळ पर्यंत पूर्ण होईल.
गांजाच्या झाडांची प्रत्येकी उंची ही ३ ते ४ फूट आहे अशी माहीती सूञांनी दिली. सदर क्षेञातील गांजा हा २ क्वींटलपेक्षा अधिक असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामा प्रसंगी तहसिलदार सुचिता चव्हाण, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, स. पो. नी गणेश अहीरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, राजेश पाटील, मिलींद कुमावत, अनिल पाटील, जुबेर खाटीक, संदीप पाटील, संतोष चौधरी उपस्थित होते.

