भडगाव : तालुक्यातील दिवाळीच्या दिवशी उगवलेला सूर्य अनेकांसाठी आनंददायी ठरला असला तरी, वडगाव (मुलाणे), ता. पाचोरा येथे याच दिवशी एकाच घरातील दोघांचा अस्त झाला. येथील पिता पुत्राचा नदीत बुडून मृत्यू कृष्णा पवार व लालसिंग पवार झाल्याने पूर्ण गावावर शोककळा पसरली होते.

वडगाव (मुलाणे), ता. पाचोरा येथील शेतीच आपले विश्व मानणारे लालसिंग पंडित पवार (४२) त्यांचा आठवीत शिकणारा एकुलता एक मुलगा कृष्णा लालसिंग पवार (१३) हे पिता पुत्र दिघी कपाशी वेचून घरी परतत असताना कृष्ण याचा नदी किनाऱ्यावरून पाय घसरल्याने तो नदीत जाऊन पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचे वडील लालसिंग यांनी त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी टाकली. मात्र, त्यांना देखील पोहता येत नसल्याने ते देखील बुडू लागले. ते मुलापर्यंत पोहोचले आणि मुलाने वडिलांना मिठी मारली. पवार यांच्या पुतण्याच्या लक्षात ही बाब येताच या मुलाने घराकडे धाव घेत घटना आजोबांना सांगितली.
लालसिंग याचे वडील पंडित पवार यांनी त्याठिकाणी येत नदीत उडी मारली, तोपर्यंत वडगाव येथील शेतकरी जयसिंग पवार यांनी पिता ‘पुत्रास बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्यातच घट्ट मिठी मारत अखेरचा श्वास घेतला. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पिता पुत्रास चाळीसगाव येथे हलविण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. दि २५ रोजी सकाळी एकच वेळी पिता पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लालसिंग पवार यांना मुलगी असून अकरावीत शिक्षण घेत आहे. तर कृष्णा हा एकुलता एक मुलगा तो आठवीत शिक्षण घेत होता. घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील यांनी पवार कुटुंबीयांचे सांत्वन करत मृताच्या वारसास शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

