अमळनेर: शिरुड गावात मारुती मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी चावळीवर मीटिंग बोलवत मारुती मंदिर नवीन स्वरूपात बांधकाम झाले असून या मंदिरात मारुतीरायाची पुनर्स्थापना अथवा जिर्णोद्धार करावा. याबाबत चर्चा सुरू असताना यश कंट्रक्शन चे संचालक महेंद्र पाटील यांनी तरुणांसाठी अतिशय मोलाचा असा संदेश तरुण वर्गाला दिला आहे. हेल्मेट ही जीवनासाठी किती महत्त्वाची गोष्ट आहे. की कधीही घराबाहेर पडताना हेल्मेट अवश्य वापरा असे आवाहन तरुणांना केले आहे.

तर शहरातील वाढत्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रकारे वर्दळ असते. रस्त्यावर वाहने सुसाट व वेगाने सुरू असतात. यामुळे आपण आपली काळजी जरूर घेतली पाहिजे. शहरालगत छोटे-मोठे अपघात होत असतात. काही वेळा हेल्मेट नसल्याकारणाने अपघातात डोक्याला मारही लागला आहे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये खर्च देखील केला आहे. तर अशा अपघातात अनेकांचे जीवही गेली आहेत. अशा अनेक घटना आपल्या नजरेसमोर अथवा ऐकण्यास मिळाल्या आहेत. आई वडील आपल्या मुलांना सणासुदीला वाहने मोटरसायकली घेऊन देत असतात तरी मात्र त्या सोबत किमान 500 रू किमतीचे एक हेल्मेट जरूर घ्यावे. व ते घराबाहेर पडताना जरूर वापरावे. याची सवय करून घ्यावी निष्काळजीपणा कधी करू नका सगळ्यात महत्त्वाचा असेल तर तो म्हणजे आपला जीव आणि त्याची आपण काळजी जरूर घेतलीच पाहिजे. हेल्मेट नसल्यामुळे अनेकांचे जीव गेल्याने. अनेक परिवार उघड्यावर पडले आहेत. घरातील कर्ता पुरुष हरपल्याने संपूर्ण परिवारावावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. असे अनेक परिवार आपल्याला पाहायला मिळतील तरी देखील आपण या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात आपला जीव अतिशय मोलाचा आहे. आपण घराबाहेर पडताना हेल्मेट जरूर बाळगाव हेल्मेट ही एवढी महागडी वस्तू नाही. जर आपण लाख दीड लाख रूपये किमतीचे मोटरसायकल घेत असाल तर किमान 500 रुपये किमतीचे हेल्मेट सुद्धा जरूर घ्यायला हवे. मोटर सायकलवर फिरताना हेल्मेटची सवय करून घ्या. पण घराबाहेर पडताना नेहमी हेल्मेट वापरा. हेल्मेट वापरा कारण डोकं आहे.

