तुम्हाला माहिती असेल, जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागाच्या 13 हजार जागांसाठी मार्च 2018 मध्ये भरती निघाली होती. मात्र, कोरोनामुळे, आरक्षणाच्या अडचणीमुळे व त्यानंतर महापोर्टलच्या रद्द होण्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती.
मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे – पुढच्या 2 महिन्यांत आरोग्य विभागात 10,127 जागांसाठी भरती होईल.
त्यासाठी फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा घेऊन या जागा भरणार असल्याचे आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे – तसेच भरतीचे नवे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे
असे असेल वेळापत्रक
1 ते 7 जानेवारी 2023 – आरोग्य भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल.
25 ते 30 जानेवारी – उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल.
31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी – पात्र उमेदवारांची यादी जाहीर
25 व 26 मार्च – विविध पदांसाठी भरती परीक्षा होईल
27 मार्च ते 27 एप्रिल – पात्र उमेदवारांची निवड