रब्बी हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. विभागीय कृषी सहसंचालकांनी 19 कंपन्यांच्या खतांवर बंदी घातली असून, शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे.

कशामुळे घातली बंदी ?
कृषी विभागीय सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार, कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विविध खतांचे 92 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
त्यात 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणित आढळले. त्यामुळे या खतांवर बंदी घातली आहे. त्यानुसार जिंकेटेड एसएसपी, रामा फॉस्फेट, उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस,
तसेच सायन्स केमिकल्स, नाशिक, एस.एस.पी. के. पी. आर. ऍग्रो केम यांसह विविध 19 खतांची राज्यात विक्री करण्यास सरकारने बंदी घातली आहे.

