अमळनेर: तालुक्यातील कळमसरे शिवारात निम येथील रहिवासी असलेल्या माय लेकींनी विहिरीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली असून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगत असल्याने खडबळ उडाली याबाबत मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की अमळनेर तालुक्यातील निम येथील रहिवासी जयश्री समाधान कोळी (वय 30 वर्ष) व मुलगी नंदिनी समाधान कोळी (वय 8 वर्ष ) ह्या दोन्ही मायलेकींनी आज दुपारी ०३:३० वाजेच्या सुमारास कळमसरे शिवारातील सबस्टेशन जवळील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली . या घटनेने संपूर्ण परिसर हादरला नागरिकांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. मारवड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश खलाने करीत आहे.