जळगाव: रेल्वे स्थानकाजवळील भुसावळकडील दिशेने मेन लाईन लगत 04:00 च्या सुमारास km No. 420/23A-25 डाऊन मेन लाईन वर मयत व्यक्ती आढळला. सदरल व्यक्ती अनोळखी असल्याने धावत्या मालगाडच्या धक्याचे जखमी होऊन जागीच मृत अवस्थेत आढळला. सदर व्यक्तीचे वय अंदाजे 55 वर्ष असून वर्णन अंगावर पांढऱ्या रंगाची पॅन्ट ,शर्ट ,पांढरी दाढी, सळ पातळ बांधा, रंग निमगोरा असे वर्णन असून सदरील व्यक्तीचे ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे पुढील तपास पो.ना सचिनकुमार भावसार करीत आहे.


