अमळनेर: मुडी प्र डांगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वितरण करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रविण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
शनिवारी मुडी प्र डांगरी येथील नवनिर्वाचित संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष व बळीराजा अॅग्रो एजन्सी चे संचालक किरण नानासाहेब सुर्यवंशी यांनी स्वखर्चाने या साहित्याचे वितरण सकाळी वह्या व शालेयपयोगी वस्तूंचे वाटप केले.
यावेळी तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी प्रविण गायकवाड यांचे विचार मांडून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या
कार्यक्रमात प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी व मुख्याध्यापक आर के पाटील, गावातील प्रतिष्ठीत नागरिक सेवानिवृत्त शिक्षक आर एम पाटील, नंदकिशोर पाटील माजी सैनिक भैयासाहेब पाटील, महेंद्र पाटील, पुरुषोत्तम पाटील, संजीव पाटील, चंदु पाटील, पंढरीनाथ पाटील, भैया माधवराव पाटील, संतोष पाटील, जयेश पाटील, बाळा पाटील, पत्रकार सुनिल पाटील आदिंची उपस्थितित कार्यक्रम संपन्न झाला.शेवटी या कार्यक्रमाचे आयोजक किरण पाटील यांनी आभार मानले.


