चोपडा: शिरपूर चोपडा रस्त्यावरील गलंगी येथील 45 वर्षीय महिलेचा डोक्यात लाकडी दांडा मारून खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. (Sahabai Magan barela)सहाबाई मगन बारेला (45, गलंगी, ता. चोपडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या खून प्रकरणी संशयीत आरोपी म्हणून पोलिसांनी सावत्र मुलगा दीपक मगन बारेला (Deepak Magan barela) (25) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बारेला यांची सहाबाई बारेला ही सावत्र आई असून ती मुलाला वागणूक व्यवस्थित देत नसल्याने या प्रकाराला दीपक वैतागला होता. रविवारी (Sunday) रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. यातूनच संतप्त मुलाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक अमर वसावे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर संशयीत तरुणाला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

