आईला घर कामात मदत करत अभ्यासात रममाण असणाऱ्या सिद्धीने सुरुवातीपासून अभ्यासात आपली चांगलीच चुणूक दाखवली 10वी आणि 12वीत देखील पहिला क्रमांक मिळवत अमळनेर शहरातील
सेंट मेरी विद्यालयात शिकणाऱ्या सिद्धीने ध्येय विचलित न होऊ देता वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ मध्ये देखील घवघवीत यश संपादन केले आहे. तिला 609 गुण मिळाले आहेत.

सिद्धीचे आई आणि वडील हे दोन्ही देखील शिक्षक असल्यामुळे आधीपासूनच घरात शिक्षणाबद्दल महत्व होते…त्याचाच परिणाम म्हणून सिद्धी अभ्यासात सातत्य ठेऊ शकली मुलीच्या या यशामुळे सगळे कुटुंबीय आनंदित झाले असून आपल्या मेहनतीला फळ आल्याचे तिच्या आई वडिलांनी सांगितले.
हीच बातमी वृत्तपत्रात वाचल्यानंतर धरणगाव शहरातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी यांनी सिद्धीच्या वडिलांशी संपर्क साधत सिद्धीच्या या यशाचं कौतुक केलंय आणि तिच्या मेहनतीला शाबासकीची थाप देत मनोबल वाढवण्यासाठी थेट अमळनेर येथे निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले आहे. यावेळी डॉक्टर कोमल महाजन, डॉक्टर सुभाष महाजन, रितेश सोनवणे, फारुख पिंजारी, आणि वडील हिंमत चौधरी, आई उपस्थित होते. युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा आणि लेखणी बळकट व्हावी याकरिता पेन देत या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगतात सुनील चौधरी म्हणाले तालुक्याची, राज्याची आणि देशाची सिद्धीच्या हातून सेवा घडो. त्याचबरोबर सिद्धी देखील व्यक्त झाली हे सर्वस्वी यश आई वडील आणि माझ्या गुरुजनांचे आहे..

