वाई (सातारा) : राज्यात आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली असून यात दाम्पत्यांचा सर्वाधिक समावेश आहे.
अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडलीय. मुल होत नसल्याच्या कारणावरून वाई तालुक्यात (Wai Taluka) नवरा बायकोनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं १० ते १२ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. या दाम्पत्यानं आत्महत्या केल्यामुळं त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना सातारा (Satara) जिल्ह्यामधील वाई तालुक्यातील कणूर इथं घडली आहे. आत्महत्या केलेलं दाम्पत्य हे शेतकरी कुटुंबातील आहे.
तानाजी लक्ष्मण राजपूरे taanaji Lakshman rajpure (वय ४०) व पूजा तानाजी राजपुरे Pooja tanaji rajpure (वय ३६ ) अशी मृतांची नाव आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १०-१२ वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना मुल होत नव्हतं. त्यामुळं ते निराश होते. या नैराश्यातून त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. तानाजी राजपूरे हे काही वर्षे मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम केल्यानंतर गावी येऊन शेती करीत होते.