अमळनेर: दि. 21 सप्टेंबर रोजी वि. का.सोसायटीची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत संस्थेचे चेअरमन प्रा.सुभाष पाटील हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. या सभेत संस्थेचा आर्थिक लेखाजोखा वाचन करण्यात आले. त्यात संस्था ही ‘अ’ वर्गाची असून संस्थेचा आर्थिक व्यवहार हा नफेत असून अंदाजित नफा ७५२००० रुपये असे वाचन केले. व हे सर्व संस्थेच्या कर्जदार सभासदांमुळे व शेतकऱ्यांच्या सहकाऱ्यांमुळेच झाले असेच प्रतिपादन प्रा.सुभाष पाटील यांनी केले यावेळी संस्थेचे व्हा चेअरमन अंनतरावर धनाजी मोरे, सदस्य तिलोत्तमा रवींद्र पाटील , अरुण मन्साराम पाटील, भास्कर वना पाटील, सिताराम रामभाऊ पाटील, धोंडू हिम्मत पाटील, सुभाष चींधा माळी, वासुदेव शांताराम पाटील, मीराबाई विश्वास पाटील, सविता हरिचंद्र पाटील, बापूराव भीमसन महाजन, गोरख भिकाजी धनगर, कर्मचारी वर्ग सचिव- रवींद्र पुंजू पाटील, सेल्समन क्लर्क विरभान बाबुराव पाटील, शिपाई राजेंद्र नथू मोरे इ. नागरिकांची उपस्थिती होती.


