धुळे – प्रतिनिधी: पावसाचा जोर वाढल्याने शहरातील देवपुर वलवाडी शिवारातील प्रभाग क्र. ६ मधील आधार नगर व दौलत नगर येथील ही परिस्थिती सर्वत्र आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होतांना अनेक अडचणीची येतात व जमीनीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे थोडी अडचण होते. पण नगर वस्तीं बरोबरच मुख्य रस्त्यांची भयानक दुरावस्था वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जावे लागते.
युवा-तरुण वर्ग ह्या परिस्थितीचा सामना करतेय पण लहान व म्हातारी माणसांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित होतोय… प्रभाग क्रमांक ६ मधील मुख्य रस्ते वाहतूक दारांसाठी मृत्यूचा सापळा बनत चाल्लाय…या वर उपाय म्हणून संबंधित नगरसेवक व धुळे महानगरपालिकेत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारही दाखल केलेली आहे परंतु दरवेळी प्रभागातील नागरिकांना दुर्लक्षित करण्यात आलेले आहे. त्यामुळे नगरवासीयांचे अत्यंत हाल होत आहेत व घराभोवती साचलेल्या पाण्याने शहरात डेंग्यू सारख्या भयानक आजाराला आमंत्रण देत आहेत..अशा परिस्थितीत धुळे महानगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी त्वरित उपाययोजना राबविणे गरजेचे आहे…अशी मागणी प्रभागातील नागरिकांकडून होत आहे.. वारंवार तक्रारी करुन देखील त्यांची दखल न घेऊन नागरिकांना दुर्लक्षित करून धुळे महानगरपालिका व प्रशासन काय सिद्ध करू इच्छिते ? असा सहाजीक प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय…!