मोठी बातमी ! – पुढील तीन ते चार दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुढील तीन ते चार दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर याच काळात मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे
यामध्ये – उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे – असे हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले

