जळगाव : भुसावळ विभागातील अठरा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून चौथ्या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. यामुळे रेल्वे गाड्या रद्द आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून पश्चिम बंगालमधील बिलासपूर विभागात सुरू असलेले चौथ्या रेल्वे मार्गाचे काम अद्याप सुरूच आहे. या कामासाठी मागील दोन महिन्यांत तीन वेळा गाड्या रद्द करण्यात आल्या. आता पुन्हा रेल्वे मार्गाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने २१ ते 28 सप्टेंबर या दरम्यान भुसावळ विभागातून धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. श्रावण महिन्यातही ऐन सणोत्सवाच्या काळात आठ दिवस गाड्या रद्द होत्या. आता पुन्हा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भुसावळ विभागातील शालिमार एक्स्प्रेस, हावडा- मुंबई मेल, पुरी- मुंबई एक्सप्रेस, हावडा- मुंबई, दुरंतो एक्सप्रेस, पुणे- हावडा दुरंतो एक्सप्रेस, हावडा- पुणे एक्सप्रेस, हटिया- पुणे एक्सप्रेस, समरसता सुपरफास्ट एक्सप्रेस, भुवनेश्वर एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, शालिमार- भुज एक्सप्रेस, पोरबंदर- शालिमार एक्सप्रेस, ओखा- शालिमार एक्सप्रेस, मालदा- सुरत एक्सप्रेस, कामाख्या एक्सप्रेस, साईनगर शिर्डी एक्सप्रेस, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस.

