पारोळा: दि. 20 रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलिंची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे श्री.सी.एम.शिंदे साहेब (निवृत्त जी.आर.पी.एफ) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सहकुटुंब सहपरिवार मिष्ठान्न,गणवेश,फळे विद्यार्थ्यांना वाटप केले.तसेच मदतीचा हात पुढे केला.समवेत नेहमी सामाजिक कार्याला धावुन जाणारे श्री.संजय महाजन (बांधकाम कॉन्ट्रॅक्टर, व्यंकटेश कन्ट्रक्शन, पारोळा व क्षत्रिय माळी समाज महामंडळ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कार्यकारणी सदस्य गुजरात,), संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर श्री.प्रभाकर बडगुजर,श्री.मिठाराम पाटील,श्री.रमेश पाटील,श्री.विजय महाजन,कु.जागृती चौधरी हे उपस्थित होते.श्री.शिंदे साहेब यांचे स्वागत सत्कार अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांनी केला.तर शाळे विषयी माहिती हेमंत महाजन सर यांनी दिली,तर सुत्रसंचलन प्रताप पाटील यांनी तर आभारप्रदर्शन जगदीश सोनवणे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले


