अमळनेर :- सतरा मजली इमारतीमध्ये लिफ्ट ची दुरुस्ती सुरू असतांना सीडी सरकुन तोल जाऊन दोन जण 16 व्या माळयावरून खाली पडून जागीच मयत झाल्याची घटना सुरत येथील पांडेसरा भागात सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली असून दोन्ही मयत मजूर हे शिरूड ता.अमळनेर येथील रहिवासी आहेत.
सुरत येथील पांडेसरा भागात प्लॅटिनियम प्लाझा नामक सतरा मजली इमारतीचे निर्माण करण्याचे काम सुरु होते.त्यासाठी शिरूड ता.अमळनेर येथील रहिवासी निलेश प्रल्हाद पाटील वय 28 व आकाश सुनिल बोरसे वय 22 हे दोन्ही जण त्या ठिकाणी लिफ्ट बसविण्याचे काम करीत होते.ते नेहमी प्रमाणे सकाळी कामावर गेले होते.16 व्या मजल्यावर लिफ्ट दुरुस्त करण्याचे काम करीत होते.त्यासाठी त्यांनी सीडी ची मदत घेऊन त्यावर उभे राहून दोन्ही जण काम करीत होते.काम करीत असताना दोन्ही जण एकाच शिडीवर दोन्ही काम करीत असतांना सीडी सरकली.त्यात त्यांचा दोघांचा तोल जाऊन ते 16 व्या मजल्यावरुन खाली पडले.उंचीवरून पडल्याने त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.तेथील काही कामगारांनी परिसरात काम करणाऱ्या कामगारांना ही घटना सांगितली.घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविले.
दरम्यान दोन्ही जण हे नुकताच गणेशोत्सव साजरा करून मजुरी साठी सुरत येथे गेले होते.मयत आकाश बोरसे च्या पश्यात आई वडील व एक मोठा भाऊ आहे.तर निलेश पाटील ची आईचे मे मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते.त्याच्या पश्यात वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेची संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे


