अमळनेर: धुळे रस्त्यावरील लोंढवे फाटा जवळ अपघात एकाचा जगीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

सविस्तर वृत्त असे की दोन मित्र काही कामानिमित्त धुळ्याकडून अमळनेर कडे मोटर सायकलवर येत असताना मागून येणाऱ्या मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा बाजूला फेकला गेल्याने जखमी झाला आहे. ही घटना अमळनेर धुळे रस्त्यावरील लोंढवे फाट्या जवळी आज गुरवार रोजी दुपारी 1 वा सुमारास घडली अपघातातील मृत व्यक्तीचे साहिल खान पठाण रा धुळे वय 25 आहे. तर दुसरा जखमी असून त्याला रुग्णालयात हल हलवण्यात आले. याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

