जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील एका अल्पसंख्यांक आदिवासी महिलेसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणी पहूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. परंतु आज दोन आठवडे झाले तरी आरोपींना अटक झाली नाही म्हणून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार जळगावी १५ सप्टेंबर २२ रोजी कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता त्यांची मेळाव्याच्या ठिकाणीच जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचेअध्यक्ष फारुक शेख यांनी भेट घेऊन त्यांना या गंभीर प्रकरणी थोडक्यात सविस्तर माहिती देऊन लेखी निवेदन सादर केले असता सदर प्रकरणी आजच पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याशी बोलून तुम्हास व पिडितेला न्याय मिळवून देतो असे ठोक आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले तेव्हा या वेळी राष्ट्रवादी चे जिल्हाअध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल सह शिष्टमंडळातिल युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव बाबा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक विभागाच्या प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ व शिकलगर बिरादरीचे तथा ह्यूमन राइट चे अन्वर खान यांची उपस्थिती होती.

निवेदनातील मागण्या
१) पहुर पो स्टे मधील गुन्हा क्र ३३२/२२ भादवी ३२३,३२४ व ३२६ मधे अतिरिक्त पोक्सो,अट्रासिटी,गर्भाला नुकसान,बलात्कार, व गंभीर दुखापत आदी कलमे लावण्यात यावी
२)सदर तपास महिला पोलिस अधिकाऱ्या मार्फत करण्यात यावा
३)आरोपीस त्वरित अटक करावी.
४)अत्याचार पिडितेला शासना तर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे
५) सदर प्रकरणाचा तपास १५ दिवसाच्या आत पूर्ण करून न्यायालयात दोषारोपण पत्र सादर करावे
६)प्रकरण जलद न्यायालयात पाठवून आरोपीस कड़क शिक्षा करण्यात यावी
अशा ६ मागण्या करण्यात आल्या आहेत.
वरील फोटोत माननीय अजित दादा पवार यांना निवेदन देउन चर्चा करतांना फारूक शेख,बाबा देशमुख,सौ प्रतिभा क्षीरसाट, व अनवर खान आदी दीसत आहे.

