मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने आज दक्षिण मुंबईतल्या झव्हेरी बाजारात कारवाई केली. ईडीने सराफा व्यापाऱयाकडून 91.5 किलो सोने (gold)आणि 340 किलो चांदी (silvar) जप्त केली.

जप्त केलेल्या सोने आणि चांदीची किंमत सुमारे 47 कोटी रुपये इतकी असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.(ED says the value of the seized gold and silver is around Rs 47 crore.)
मार्च 2018 मध्ये पारेख ऍल्युमिनेक्स लिमिटेडविरोधात ईडीकडे मनी लॉण्डरिंगची तक्रार आली होती. या कंपनीने अनेक बँकांना फसवून सुमारे 2298.58 कोटींचे कर्ज घेतले होते. त्यानंतर ते पैसे विविध कंपन्यांच्या माध्यमातून असुरक्षित कर्ज आणि गुंतवणुकीच्या संदर्भात विविध खात्यांत पाठवले. कर्ज घेण्याचा उद्देश हा वेगळा होता आणि त्यासाठी कोणतेही करार केले गेलेले नसल्याचे ईडीचे म्हणणे आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर 2019 मध्ये ईडीने कंपनीची चौकशी करून सुमारे 158.26 कोटी रुपये जप्त केले होते.

