तेरापंथ युवक परिषदेच्या अभियानास अनेकांचे मिळतेय समर्थन
अमळनेर,-अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद अमळनेर च्या वतीने आणि रोटरी क्लब, लायंस क्लब ,जैन सोशल ग्रुप ,प्रफुल्ल कॉमर्स एकेडमी ,एचडीएफसी बैंक यांच्या सहकार्याने मेगा ब्लड डोनेशन कॅम्प,महा रक्तदान शिबिराचे आयोजन दि 17 सप्टेंबर रोजी अमळनेरात केले असल्याने सदर कॅम्प ला समर्थन देण्यासाठी अनेक संस्था व अधिकारी पुढे येत आहेत.
आतापर्यंत अमळनेरात एकावेळी 300 पेक्षा अधिक रक्तदानाचे टार्गेट झाले नसताना या अभियानातून एकाच दिवशी 1008 बॅग रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून तेवढा जोरदार प्रतिसाद देखील मिळत असल्याने एकप्रकारे अमळनेर साठी ते रेकॉर्डच ठरणार आहे.या शिबिरासाठी 17 तारखेला मध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प लावण्यात येणार असून त्याची जबाबदारी काही संस्था घेणार आहेत.अनेक संस्था स्वतः संपर्क साधून आपले समर्थन जाहीर करीत आहेत.
आतापर्यंत यांनी दिले समर्थन,,
सदर मेगा कॅम्प ला प्रांताधिकारी सीमा अहिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी,खान्देश शिक्षण मंडळ,प्रताप महाविद्यालय,लायन्स क्लब,रोटरी क्लब,अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना,खान्देश रक्षक संघटना,महाराणा प्रताप मित्र मंडळ,स्वामींनारायन मंडळ, सखल जैन मंडळ,न्यू प्लॉट परिसर विकास मंच,राष्ट्रीय सेवा केंद्र, टिळक मित्र मंडळ आदींनी समर्थन दिले असून मुंदडा फाऊंडेशनचे चे अध्यक्ष प्रकाश मुंदडा हे स्वतंत्र कॅम्प द्वारा 200 प्लस बॅग रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवणार आहेत,याशिवाय माळी मढीत झालेल्या सर्व समाजाच्या सदभाव बैठकीत देखील या महा अभियानास समर्थन मिळाले आहे.
गिनीज बुकमध्ये होणार रेकॉर्डतेरापंथ युवक परिषदेचे हे अभियान 17 सप्टेंबर रोजी भारतभर राबविण्यात येणार असून जम्मू पासून खालच्या टोकापर्यंत सगळीकडे कॅम्प लावून 2 लाखा पेक्षा अधिक बॅग रक्त संकलित केले जाणार आहे,यामुळे याची गिनीज बुकमध्ये वर्ड रेकॉर्ड म्हणून नोंद होणार आहे.यामुळे सदर रेकॉर्ड मध्ये अमळनेर चाही मोठा वाटा असणार आहे.तसेच याच दिवशी भारत देश वगळता आठ देशात देखील कॅम्प लावले जाणार आहेत.
संकलित रक्त देणार परिसरातील रक्तपेढ्याना सदर संकलित केलेले रक्त अमळनेर सह जळगाव व धुळे येथील रक्त पेढ्याना दिले जाणार असल्याने परिसरातील गरजू रुग्णांसाठी ही बाब मोठी दिलासादायक ठरणार आहे,आतापर्यंत अमळनेर येथे रक्तदाते तेच तेच लोक पुन्हा पुन्हा रक्तदानासाठी पुढे येत असल्याचे दिसून आले आहे,नवीन मंडळी अजूनही भितीपोटी पुढे येत नाही,मात्र या मेगा कॅम्प मुळे नवीन रक्तदाते देखील तयार होणार असून हे दाते भविष्यासाठी दिलासादायक ठरतील अशी भावना प्रतीक जैन यांनी व्यक्त केली आहे.
येथे असतील रक्तदानाचे कॅम्प,,,
1 तेरापंथ भवन,न्यू प्लॉट अमलनेर,2 रोटरी हॉल,पिबीए स्कुल जवळ अमलनेर,3 स्वामीनारायण मंदिर अमळनेर,4 टाऊन हॉल अमळनेर, प्रताप महाविद्यालय अमळनेर,सदर कॅम्प दिनाक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पासून ते 5 पर्यन्त लावण्यात येणार आहे.
तरी नागरिकानी 17 सप्टेंबर रोजी जरूर रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे,अधिक महितीसाठी दर्शन जैन 9325350009 आणि योगेश छाजेड 9923711101