चाळीसगाव:- बैल पोळा सण हा शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. महाराष्ट्रात या सणाच्या दिवशी देखिल दुखत घटणा घडल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला चाळीसगाव तालुक्यातील अभोणे येथील थरारक घटना गावात दारूच्या नशेत असलेल्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात बैल पूजनाची लोखंडी पास डोक्यात घालून खून केला अशी माहिती मिळाली आहे. ही घटना दिनांक 26 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा (crime) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील अभोणे येथे बैल सणाच्या उत्साह सुरू असताना. मोठा भाऊ पिंटू तुकाराम पाटील (३८) व लहानभाऊ शिवाजी तुकाराम पाटील (३२) हे घरी बैल पूजनासाठी आले. तितक्यात त्यांच्यामध्ये किरकोळ वाद होऊन वादाचे परिवर्तन हाणामारीत झाले. दारापुढे बैल पूजनाची तयारी सुरू असताना हा वाद सुरू होता, जवळच बैल पूजनासाठी लोखंडी पास ठेवण्यात आली होती, मोठा भाऊ पिंटू तीच पास घेऊन, लहान भाऊ शिवाजी यांच्या डोक्यावर तीन वार केले, डोक्यावर जोरदार प्रहार झाल्यामुळे लहान भाऊ शिवाजी जागीच गतप्राण झाले.
त्याला तात्काळ चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती कळताच मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्राप्त माहितीनुसार दोघे भाऊ दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. आणि दारूच्या नशेतच वाद होऊन, मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात लोखंडी पास घालून खून केल्याचे गावात चर्चा आहे. सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

