जळगाव:- तालुक्यातील वावडदा येथे पोळा सण साजरा करत असताना की घटना घडल्या अचानक घाबरल्याने चक्क बैल चक्क घराच्या छतावर चढून खाला पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव तालुक्यातील वावडदा येथील गोकूळवाडा येथे पोळा सण साजरा करत असतांना शेतकऱ्यांचा बैल बिथरल्याने चक्क घरातच्या जिन्यावरून छतावर चढला. शेतकऱ्याने त्याला खाली उतरवण्याच्या प्रयत्नात असतांना घराच्या छतावरून खाली पडला. खाली सिमेंट काँक्रीटचा रोड असल्याने या घटनेत नंदीबैल गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेमुळे वावडदा गावात खळबड उडाली आहे.

