दोन महिन्यांपूर्वी पत्नी वारल्यामुळे मानसिकरित्या अस्वस्थ झालेल्या तरूणाने टोकाचे पाऊल उचलले असून अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्याला उपचारासाठी विजापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा आज (शुक्रवार) सकाळी मृत्यू झाला. मृत्यू पावलेला तरूण अथणी तालुक्यांतील झुंजरवाड येथील रहिवाशी असून, सदाशिव रामाप्पा कांबळे Sadashiv ramapaa kamble (वय 26) असे युवकाचे नाव आहे. या प्रकरणी ऐगळी पोलिस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत ऐगळी पोलिस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, सदर रॉकेल ओतून आत्महत्या केलेल्या तरूणाची पत्नी रूपा सदाशिव कांबळे (Rupa Sadashiv Kamble) (वय 21) हिचे गेल्या दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे पत्नीच्या अकाली निधनामुळे सदर तरूणाला मानसिक रित्या धक्का बसला होता.
गुरूवार सकाळी अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले होते. त्यामुळे लगेचच नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी विजापूर (vijapir)येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचाराचा काहीच उपयोग न झाल्याने त्याचा आज सकाळी मृत्यू झाला.

