औंरगाबाद:- पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादेतील फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे घडली आहे.

पंढरीनाथ कचरू काळे (वय 33) (pandarinath kacharu kale) आणि रितेश अजिनाथ काळे (Ritesh ajinath Kale) (18) असे मृत काका पुतण्याची नावे (Farmer) आहेत. पोळा असल्याने खानबैलीच्या दिवशी अर्थात पोळ्याच्या आदल्या दिवशी बैल धुण्यासाठी पंढरीनाथ काळे हे पुतण्या रितेश आणि पवन यांना सोबत घेऊन शेतालगत असलेल्या पाझर तलावात गेले. बैल धुताना अचानक पंढरीनाथ यांना बैलाने झटका दिला. यामुळे ते तलावात पडले.
काका तलावात पडल्याचे पाहून पुतण्या रितेशने त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. परंतु, यात काका व पुतण्याला बाहेर निघता आले नाही. दुर्दैवाने दोघांचाही बुडून (Death) मृत्यू झाला. ऐन पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच घटना घडली थोडा हा सण शेतकरी वर्गासाठी आनंदाचा असून सणाला शेतकरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. हळहळ व्यक्त होत आहे.

