यावल:- तालुक्यातील चितोडा येथील तरूणाच्या हत्येमुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच पुन्हा एकदा तालुका खुनाने हादरला आहे.

यावल शहरातील महाजन गल्ली काझीपुरा रस्त्यावर आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नाजिया जलील काझी वय 35 रा.काजीपुरा या महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला हल्ल्यात ही महिला गतप्राण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसर हादरला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

