पैठण:- येथे मुलीचे आधार नोंदणी करून घराकडे परतत असताना पैठण – पाचोड रस्त्यावर मोटरसायकलचा अपघात होऊन बापलेकीचा मृत्यू झाला. या घटनेची जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सतीश शिवाजी शिंदे (satish shivaji shinde)आणि गायत्री सतीश शिंदे gayatri Satish shinde (वय १०) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती, गायत्री शिंदे हिला पैठण (paithan) तालुक्यातील खेर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरी वर्गात शिक्षण घेत होती. शिक्षकांनी तिला आधार कार्ड नोंदणी करून आणण्याचे सांगितले होते. सोमवारी (दि.२२) दुपारी पैठण येथे ती आधार नोंदणी करण्यासाठी वडिलांससोबत गेली होती. घरी परतताना पैठण पाचोड रस्त्यावर मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात गायत्रीचा चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला होता. तर जखमी झालेल्या सतीश शिंदे यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांचा सोमवारी रात्री उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर आज (मंगळवारी) खेर्डा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अपघातात बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकूल करत आहेत.

