अमळनेर- (प्रतिनिधी)
आम आदमी पार्टीचा जिल्हा मेळावा २१ऑगस्ट रोजी जळगाव येथे पार पडला. जिल्हा अध्यक्ष प्रा. तुषार निकम सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्यात ज्येष्ठ सल्लागार डॉ. सुनील गाजरे. महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर, शिवाजी पाटील,अमळनेर, शिवराम पाटील पळासदडे, अमळनेर तालुका अध्यक्ष संतोष पाटील, आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात अमळनेर येथील डॉ रुपेश संचेती यांची जिल्हा संघटक म्हणून, महेश संतोष पवार जिल्हा सचिव तर प्रा. गणेश महादेव पवार यांची जिल्हा सह संयोजक पदी निवड करण्यात आली.
त्याच प्रमाणे अमळनेर आम आदमी पार्टी तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्ष- संतोष पाटील, सल्लागार- धनंजय सोनार, तालुका संघटक- राजेंद्र भाऊराव पाटील , तालुका सचिव- स्वप्निल नवल पाटील, शहर संयोजक- भागवत ओंकार बाविस्कर, सचिव- रामकृष्ण चिंतामण देवरे, शहर संघटक- नंदू जगन्नाथ पाटील, अल्पसंख्याक आघाडी संयोजक- सलीम खान उर्फ लियाकत वायरमन.


