राज्याच्या विविध भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळाचे रुपांतर झाल्यानं –

उद्या आणि परवा दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने सांगितले – कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे , तर विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. – तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

