अमळनेर:- तालुक्यातील इंद्रापिंप्री येथील शेतकरी संजय वेळूमन पाटील (वय ४२) यांनी शनिवार (२० ऑगस्ट) रोजी सकाळी शेतात निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शेतकरी संजय पाटील यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त जात आहे.

नागरिकांच्या मदतीनी मृतदेह उतरवून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शेतकरी संजय पाटील यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद अमळनेर पोलिस ठाण्यात करण्यात आली. सदर घटनेचा तपास पो.कॉ कैलास शिंदे करीत आहे.

