खामगाव:- जळगावहून लोणारला जाणारा पंचवीस लाखांचा गुटखा जप्त ! प्रतिनिधी- शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री होत असल्याच्या माहितीवरून अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या पथकाने कारवाई करून २५ लाखाचा गुटखा व वाहनासह सुमारे ४० लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवार, २० ऑगस्ट रोजी मेहकर येथील लोणार फाट्यावर करण्यात आली आहे.

पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, (According to the information received from the police source) जळगाव खान्देश येथून लोणार येथे आयशर वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलिस अधीक्षक यांना मिळाली होती. त्या आधारे त्यांच्या पथकाने लोणार फाटा मेहकर येथे नाकाबंदी करत (एम एच ०४/ईबी /९८७२) या क्रमांकाचे आयशर वाहन पकडले. तपासणी दरम्यान पोलिसांना वाहनात २५ लाख ६३ हजार २०० रुपयांचा ‘राजनिवास’ सुगंधी पान मसाला-गुटखा आढळून आला. दरम्यान पोलिसांनी वाहनासह एकूण ४० लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अजय लीलाधर गोसावी, सागर यशवंत औतार (दोघं रा. जळगाव) आणि गजानन मापारी (रा. लोणार) याच्या विरुद्ध मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात व अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरिक्षक पंकज सपकाळे, पोहेका गजानन बोरसे, नापोका गजानन आहेर, नापोका संदीप टकसाळ व राम धामोडे यांनी केली. या धडक कारवाईमुळे गुटख्याची विक्री व तस्करी करणाऱ्यांमध्ये एकच दहशत पसरली आहे.
जळगावचा मुख्य गुटखा माफिया रडावर (The main gutkha mafia of Jalgaon has come to the fore.)
संशयित आरोपी अजय लीलाधर गोसावी, सागर यशवंत औतार (दोघं रा. जळगाव) हे दोघं चालक व क्लिअर आहेत. त्यामुळे माल जळगावहून लोणारला गजानन मापारी (रा. लोणार) याच्याकडे पोहचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. परंतू आता या गुटख्याचा मालक कोण? या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला असून जळगावचा मुख्य गुटखा माफिया रडावर आला आहे.
(The main gutkha mafia of Jalgaon has come to the fore.)

