पोलीस वृत्त- राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. सख्या नात्याला काळीमा फासणाऱ्या धक्कादायक घटना घडण्याच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होत चालली आहे. अशात आता मुली घरातही सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. तर मुली सुखी कुठे राहणार असा प्रश्न आता पुढे उभा आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील हादगाव इथे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरामध्ये झोपले असताना वडिलांनी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग केला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये आईने दिलेल्या तक्रारीवरुन बापच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हदगाव इथे एक तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात पलंगावर झोपली होती. यावेळी त्या ठिकाणी मुलीचे वडील आले. मुलींनी एकटी पाहून त्यांनी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग केला. अशा नराधम बापाच्या मनात जरा सुद्धा दया आली नाही की ही आपली मुलगी आहे. मुलीने विरोध केल्यानंतर वडिलांनी घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने झालेला प्रकार आपल्या आईला सांगितला.
यानंतर मुलीच्या आईने पाथरी पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बापा विरोधात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाथरी पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

