जम्मू-काश्मिरात आयटीबीपी म्हणजेच इंडो-तिबेटीयन बॉर्डर फोर्सच्या जवानांच्या बसला मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बसमध्ये आयटीबीपीची ३७ जवान आणि जम्मू-काश्मिरचे दोन पोलीस प्रवास करत होते. पहलगाव जवळ एका खोल दरीत ही बस कोसळली आहे.

या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, यात 6 जवान अपघातात शहीद झाले असून सर्व जण 32 जखमी झाले आहेत. यात मृतांचा आकडा वाढल्याची भिती आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आलेली नाही. तर, याची माहिती मिळताच सैन्यदलाने येथे धाव घेत जखमी सैनिकांना तेथून काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

