शिंदखेडा पोलीस वृत्त- तालुक्यातील देवाचे विखरण येथे अंगणवाडी इमारतीची दुर्दशा झाली असून अंगणवाडी मोडकळीच्या दिशेने आहे. पावसामुळे गळत असल्याने वर्ग खोलीत मोठ्या प्रमाणे पाणी साचते. गळणारे पाणी अंगणवाडीतील सेविका व मदतनीस हाताने बाहेर काढतात. अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांचे पुस्तके कपडे भिजत असल्याने मुलांचे नुकसान होते. अजब प्रकार उघडकीस आला आहे.
अंगणवाडीतील स्लॅबला तळे गेले आहेत. वर्ग खोलीतील पंख्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. अंगणवाडी परिसरात पुर्णपणे गवताळ आहे. तसेच अंगणवाडी स्वच्छतागृहाची टाकी देखील उघडी असते. त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने डासांचा प्रादुर्भाव होतो. त्याचप्रकारे गावातील गटारी देखील अंगणवाडीच्या दिशेने प्रवाह करतात. डासांचा प्रादुर्भाव होऊन आजाराला आमंत्रण देत आहे. लहान बालकांच्या जीवाशी एक प्रकारे खेळच
संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असता. मात्र ग्रामपंचायत देखील याकडे दुर्लक्ष करत आहे. अंगणवाडी लवकरच दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांन कडून होत आहे