• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

केरळमध्ये ‘मेंदू खाणाऱ्या अमीबा’चा कहर : १९ जणांचा बळी

policevrutta by policevrutta
September 18, 2025
in आरोग्य, क्राईम, राज्य
0
केरळमध्ये ‘मेंदू खाणाऱ्या अमीबा’चा कहर : १९ जणांचा बळी
0
SHARES
369
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस वृत्त न्यूज : केरळमध्ये दुर्मिळ आणि घातक अशा मेंदूतील संसर्ग अमीबिक मेनिन्जोएन्सेफलाइटिसमुळे मृत्यूंचं सत्र सुरूच आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या आजाराने १९ जणांचा मृत्यू झालाय. यातील अनेक मृत्यू गेल्या काही आठवड्यांत झाले असून यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य अधिकारी प्रायमरी अमीबिक मेनिन्जोएन्सेफलाइटिसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर सतर्क झाले आहेत.
मेंदूतील हा असा संसर्ग आहे, ज्यामुळे मृत्यूचं प्रमाण अत्यंत जास्त आहे. नेग्लेरिया फाउलेरी या अमीबामुळे हा संसर्ग होतो. याला “मेंदू खाणारा अमीबा” असंही म्हटलं जातं. केरळमध्ये २०२५ मध्ये ६१ जणांना या आजाराची लागण झाली असून त्यापैकी १९ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजार दुर्मिळ आहे. अमीबा असलेल्या तलावात पोहणाऱ्या सुमारे २६ लाख लोकांपैकी केवळ एकालाच याची लागण होण्याची शक्यता असते.
केरळच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, जुलै महिन्यात मेंदूच्या तापाची प्रकरणे वाढली. त्यानंतर राज्याच्या उत्तर जिल्ह्यात विहिरी आणि तलावांमध्ये क्लोरीन फवारणी करण्यात आली. स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. केरळ सध्या गंभीर अशा आव्हानाचा सामना करत असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. सुरुवातीला कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांत काही रुग्ण आढळले होते. मात्र आता राज्यात इतर ठिकाणीही रुग्णांना या आजाराची लागण झाल्याचे दिसून येते.
आरोग्यमंत्री वीना जॉर्ज म्हणाल्या की, तीन महिन्यांच्या बाळापासून ९१ वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेकांना याची लागण झाली आहे. गेल्या वर्षी एका ठिकाणी पोहणाऱ्यांमध्ये याचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले होते. पण यावेळी वेगवेगळ्या ठिकाणांहून रुग्ण आढळून येत असल्याने हा संसर्ग नेमका कसा होतोय, हे शोधण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.
मेंदू खाणाऱ्या अमीबाचा संसर्ग झाल्यानंतर मेंदूतील पेशी नष्ट होऊ लागतात. अनेक रुग्णांच्या मेंदूला सूज येते आणि त्यानंतर मृत्यू होतो. हा दुर्मिळ आजार असल्याचे केरळ सरकारने म्हटले आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला या आजाराचा संसर्ग होत नाही. स्थिर, ताज्या आणि गरम पाण्यातून याचा प्रसार होतो. नाकाद्वारे हा अमीबा शरीरात प्रवेश करतो.

Previous Post

राशी भविष्य १८ सप्टेंबर २०२५ : भाग्य, शुभ रंग आणि सल्ला

Next Post

“मोठ्या शाळांना झटका – जिल्हाधिकाऱ्यांच्या पोरांचा थेट अंगणवाडीत प्रवेश”

policevrutta

policevrutta

Next Post
“मोठ्या शाळांना झटका – जिल्हाधिकाऱ्यांच्या पोरांचा थेट अंगणवाडीत प्रवेश”

“मोठ्या शाळांना झटका – जिल्हाधिकाऱ्यांच्या पोरांचा थेट अंगणवाडीत प्रवेश”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!