• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

शिक्षण क्षेत्र हादरले: शालार्थ आयडी घोटाळ्यातील ६३२ शिक्षकांवर झाडाझडती सुरू

policevrutta by policevrutta
September 17, 2025
in Uncategorized, क्राईम, नागपूर, प्रशासन, राज्य, शैक्षणिक, शैक्षणिक क्षेत्र
0
शिक्षण क्षेत्र हादरले: शालार्थ आयडी घोटाळ्यातील ६३२ शिक्षकांवर झाडाझडती सुरू
0
SHARES
385
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर: पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणून राज्यभर गाजणाऱ्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात अडकलेल्या संशयित ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा संचालकांची झाडाझडती मंगळवारपासून अखेर सुरू करण्यात आली.
पहिल्या दिवशी ५० शिक्षकांना सुनावणीस बोलावून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. नियुक्तीबाबतच्या कागदपत्रांची पुर्तता न करू शकणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई होईल, हा चर्चेचा विषय ठरला आहे.
शिक्षण आयुक्तांनी शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात संशयित शिक्षकांची सुनावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. ही सुनावणी उपसंचालक पातळीवर होत असून, उपसंचालकांनी यासाठी एक समिती गठित केली आहे. या समितीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) येथील अधिकारी समाविष्ट आहेत. सुनावणी डायटच्या कार्यालयातच सुरू आहे.
शालार्थ घोटाळ्यात जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शालार्थ आयडीच्या माध्यमातून त्यांना वेतनसुद्धा सुरू करण्यात आले होते. या प्रकरणात सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल असून, आतापर्यंत २० अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार संशयित शिक्षकांची सुनावणी आता उपसंचालक पातळीवर होत आहे. शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी प्रथम संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शाळा व्यवस्थापकांना नोटीस बजावली होती. त्यानुसार मंगळवार, १६ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली.
बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात उपसंचालक कार्यालय स्वतः तक्रारदार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या शिक्षकांचे शालार्थ आयडी उपसंचालक कार्यालयातून बनविलेलेच नाहीत. अनेक शिक्षकांची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाली आहे. अशा शिक्षकांना अयोग्य ठरविले जाऊ शकते, असा अंदाज आहे.
शिक्षकांची संख्या अधिक असल्याने पहिल्या दिवशी ५० शिक्षकांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापकांचाही समावेश आहे. या प्रकरणात ६३२ शिक्षक संशयित असल्याने त्यांच्या सुनावणीस १२ ते १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बरेच शिक्षक शालार्थ आयडीबाबतचे पुरावे सादर करू शकलेले नाहीत. अधिकाऱ्यांच्या मते, पुरावे सादर न करू शकणाऱ्या शिक्षकांना अयोग्य ठरवून त्यांची नियुक्ती रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे शिक्षकांची धाकधूक वाढली आहे.
**”या प्रकरणाची गंभीरता पाहता संशयित शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा संचालकांची सुनावणी सुरू आहे. मंगळवारी ५० लोकांना सुनावणीस बोलाविण्यात आले. संख्या मोठी असल्याने टप्प्याटप्प्याने पंधरापेक्षा अधिक दिवस ही सुनावणी चालेल. ती पूर्ण झाल्याशिवाय या प्रकरणात काही सांगता येणार नाही. कारवाईबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल.”
माधुरी सावरकर, शिक्षण उपसंचालक, नागपूर**

Previous Post

✨ कोणासाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या _ आजचे सर्व राशीभविष्य – १७ सप्टेंबर २०२५ ✨

Next Post

वानराच्या मृत्यूने तळवाडे गाव शोकाकुल; विधीवत अंत्ययात्रा व १२ दिवसांचे सुतक पाळले

policevrutta

policevrutta

Next Post

वानराच्या मृत्यूने तळवाडे गाव शोकाकुल; विधीवत अंत्ययात्रा व १२ दिवसांचे सुतक पाळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!