• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

निस्वार्थ श्रमांच्या बळावर अमळनेरचा
श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय!

सेवेकरी, विविध संघटनांच्या अथक परिश्रमातून भक्तीरसाळ दर्शन सोहळा!

policevrutta by policevrutta
September 8, 2025
in अमळनेर, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
निस्वार्थ श्रमांच्या बळावर अमळनेरचा श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय!सेवेकरी, विविध संघटनांच्या अथक परिश्रमातून भक्तीरसाळ दर्शन सोहळा!
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त न्यूज अमळनेरमध्ये मंगळवारी, २सप्टेंबर रोजी झालेला श्री मंगळ जन्मोत्सव फक्त भव्य दर्शन सोहळा नव्हता, तर हजारो सेवेकर्‍यांच्या निस्वार्थ श्रमांचे साक्षीदार ठरलेला अद्वितीय अनुभव होता. शहरात तब्बल एक लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या यशामागे दिवस-रात्र श्रम करून काम करणार्‍या स्वयंसेवक, सेवेकरी, पदाधिकारी आणि विविध संघटनांचे योगदान मोलाचे ठरले. सेवेकरी, विविध संघटनांचे पदाधिकार्‍यांच्या अथक परिश्रमातून भक्तीरसाळ दर्शन सोहळा पार पडला.
भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांमध्ये वाहतूक नियंत्रण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, सुरक्षेची काटेकोर व्यवस्था आणि दर्शन व्यवस्थापन या सर्वच बाबतीत सेवेकर्‍यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेले दर्शनार्थी समाधानीपणे उत्सवात सहभागी झाले. महिलांचा पारंपरिक सहभाग, तरुणांचा उत्साह, वयोवृद्धांचा मार्गदर्शनात्मक सहभाग आणि बालकांचा आनंद यामुळे जन्मोत्सवाला वेगळेच रंग चढले. जयघोष, ढोल-ताशे आणि भजनी मंडळांच्या गजराने शहर भक्तिरसाने दुमदुमले.
श्री मंगळ जन्मोत्सव हा अमळनेरच्या भक्तिभावाचा तर सोहळा ठरला, पण त्याहूनही मोठी कहाणी होती ती निस्वार्थ सेवाभावाची. सेवेकर्‍यांच्या या कार्यामुळेच हा सोहळा शिस्तबद्ध, न भूतो न भविष्यती असा दिसून आला. असंख्य निस्वार्थ हात, हृदयात भक्ती आणि डोळ्यात सेवा घेऊन रात्रंदिवस झटणारे सेवेकरी, पदाधिकारी आणि विविध संघटनांचे अश्रम परिश्रम होते. प्रत्येकाने आपला वेळ, श्रम आणि सामर्थ्य अर्पण करून हा मंगलमय सोहळा अविस्मरणीय केला.

*अहोरात्र झटणारे हात…*
श्री मंगळग्रह संस्थान पदाधिकारी, सेवेकरी श्री मंगळग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्‍वस्त, अनिल अहिरराव, जयश्री साबे, डी. ए. सोनवणे, आनंद महाले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण, यांच्यासह मंगल सेवेकरी उज्वला शाह, सुनीता कुलकर्णी, प्रकाश मेखा, विनोद कदम आदींसह सेवेकर्‍यांनी अहोरात्र मेहनत घेऊन श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यात हातभार लावला.

*आमदार मित्र परिवार-*
माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार अनिल भाईदास पाटील मित्र परिवारचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य केले. तसेच महायुती, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी अथक परिश्रम घेतले.

*नगर पालिका प्रशासन-*
नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगार, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, नगर पालिका विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक, नगरसेविका आदींनी व्यवस्थेसाठी सहकार्य केले.

*पोलिस पाटील संघटना*
प्रविण गोसावी, गणेश भामरे यांच्या मार्गदर्शनात अमळनेर, मारवड पोलिस पाटील संघटना व मित्र परिवारचे सुमारे शंभर पोलिसपाटील उपस्थित होते. त्यांनी कायदा सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण, भाविकांना योग्य ते मार्गदर्शन तसेच भोजन व दर्शन व्यवस्थेबाबत सहकार्य केले.

*विविध महिला मंडळ*
शहरातील विविध महिला मंडळांच्या पदाधिकारी, महिला सदस्य यांनी या सोहळ्यात विशेष सहकार्य केले. यात मराठा महिला मंडळांच्या महिला पदाधिकारी सदस्या तसेच विवधि समाजातील महिला मंडळांच्या सदस्यांची मोठी उपस्थिती होती.

*पोलिस प्रशासन, पत्रकार*
पोलिस उपअधीक्षक विनायक कोते, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनात अमळनेर- मारवड पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला. तसेच शहर व तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य यांनीही सहभाग घेऊन भाविकांच्या व्यवस्थेसाठी सहकार्य केले.

*रोटरी, लायन्स क्लब पदाधिकारी*
रोटरी, लायन्स क्लबचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी, सदस्य यांचीही मोठी उपस्थिती होती. त्यांनी भाविकांच्या भोजन व्यवस्थेची जबाबदारी पार पाडली.

*अनिरुद्धाय अकॅडमीचे स्वयंसेवक*

श्री मंगळ जन्मोत्सवा दरम्यान संभाव्य होणारी भाविकांची गर्दी पाहता अनिरुद्धाय अकॅडमी ऑफ डिझायर मॅनेजमेंटच्या ५० स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत अतिशय शिस्तप्रिय व नम्रपणे सेवा दिली. परिणामी अलोट गर्दी असूनही कुणाला इजा देखील झाली नाही.

Previous Post

जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त ‘उडान’मध्ये विशेष मुलांना मोफत थेरपी..

Next Post

विसर्जनाच्या जल्लोषात मृत्यूचा थरार : ट्रकखाली मामी-भाचीचा दुर्दैवी अंत

policevrutta

policevrutta

Next Post
विसर्जनाच्या जल्लोषात मृत्यूचा थरार : ट्रकखाली मामी-भाचीचा दुर्दैवी अंत

विसर्जनाच्या जल्लोषात मृत्यूचा थरार : ट्रकखाली मामी-भाचीचा दुर्दैवी अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • पासपोर्ट जप्त, उंट चरवायला लावलं – भारतीय युवकाची सौदी अरेबियातून मदतीची याचना
  • “प्रेमप्रकरणाचा फटका! इकडे तिकडे लपणारे माजी सरपंच गावातून गायब”
  • राजरोसपणे डंपरने वाळू वाहतूक सुरू, महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडले — शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का अधिकारी?
  • प्रेमासाठी ६० किलोमीटर वाळवंट पार; पाकिस्तानातील युगुल भारतात शिरले
  • देवीच्या मूर्तीतून अश्रू! निम गावात चमत्कार…?
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!