धुळे: पोलीस वृत्त न्युज – डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य दोन जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक अपघात धुळे तालुक्यातील वरखेडी-आर्णी रस्त्यावर वरखेडी शिवारात घडला आहे.

जखमींना स्थानिकांच्या मदतीनं शासकिय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
धुळे तालुक्यातील वरखेडी-आर्णी रस्त्यावर वरखेडी शिवारात एक भीषण अपघात घडला आहे. रेल्वे मार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडलाय. दुचाकीस्वाराचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर, अन्य दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमका अपघात घडला कसा?
धुळे-नरडाणा रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात डंपरची वाहतूक सुरू आहे. यादरम्यान वरखेडी गावातून आंबोडे येथे कामावर जाणाऱ्या तीन मजूरांच्या दुचाकीला डंपरने भरधाव वेगाने धडक दिली. धडक इतकी जोरदार बसली की, दुचाकी पूर्णपणे चुरडली गेली आहे प्रत्यक्षदर्शीच्या मते डंपरने दुचाकीला अक्षरशः कित्येक अंतर फरफटत पुढे नेले. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आणि डंपर जप्त केला. चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

