अमळनेर: पोलीस वृत्त न्युज – शहरातील भालेराव नगर मधील मुख्य रस्त्यावर व्हालच्या खड्यावर बसविण्यात आलेली लोखंडी जाळी तुटल्याने नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. अपघाताची मालिका सुरूच आहे. मात्र याकडे नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दिसतं आहे. मागिल काही दिवसापूर्वी कॉलनीतील तरुणांनी तुटलेल्या जाळीचा व खड्ड्याची पुजा करीत नारळ फोडून दिवे लावीत नगरपालिका प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करीत याठिकाणी भला मोठ्या दगडावर गुलाल टाकण्यात आला.
या खड्ड्यामुळे अपघात दररोज अपघात होत आहेत. आता फक्त मृत्यूची प्रतीक्षा एवढेच पहायचं राहिला आहे. मुख्य रस्त्यावरील रहादारीत नागरिक, विद्यार्थी यांचा वापर मोठ्याप्रमाणात असून नगरपालिका याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. असल्याने या कॉलनीतील नागरिकांना नगरपालिका प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. मागील काही दिवसापूर्वी या खड्ड्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या तसेच मनसेने याबाबत पालिकेला देखील निवेदन दिले होते तरी देखील याबाबत महापालिकेने दखल घेतली नाही. या खड्ड्यात अपघातात एखाद्याचा मृत्यूनंतरच खड्ड्याची दुरुस्ती होईल का? असे कॉलनीतील नागरिकांकडून बोलले जात आहे. . (संपादक: रजनीकांत पाटील 8788441234)


