अमळनेर: पोलीस वृत्त न्युज – शहरासह ग्रामीण भागात दिवस आणि रात्र गौणखनिजाची बिनधास्तपणे वाहतूक केली जात आहे. प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोरून महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गौणखनिजाची वाहतूक केली जात असतानाही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागात मुरुमाची दिवसभर वाहतूक केली जात असताना, त्यास पायबंद घालण्यात महसूल प्रशासन असमर्थ ठरले आहे. वाळूमाफियांसह गौणखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या वाहनांना क्रमांक, ना चालक परवानाधारक..वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, त्या वाहनांना क्रमांकदेखील नाहीत अमळनेर शहरात मुख्य वसाहतींतून विशेषत बसस्थानकाची मागची वसाहत, साने गुरूजी शाळा, धान्य बाजार, भालेराव नगर, प्रताप विद्यालय, जी. एस. हायस्कूल या भागातून नोंदणी क्रमांक नसलेल्या अशा रेती भरलेल्या ऑटो खुलेआम फिरत असतात. अवैध असूनही त्यावर कारवाई करण्याची हिम्मत प्रशासनात कोणी करीत नाही. . (संपादक- रजनीकांत पाटील 8788441234)


