अमळनेर : पोलीस वृत्त न्युज – शहरातील वाहतुक व्यवस्था कमालीची ढेपाळली आहे. त्यातच कर्णकर्कश हॉर्नमुळे शहरवासीय हैराण झाले असून, यावर शहर पोलीसांनी अंकुश लावण्याची मागणी होत आहे.

शहरातून धावणाऱ्या काही वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे मुळे शहरात ध्वनिप्रदूषणात वाढ होत असून त्याचा त्रास आजारी रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिलांना होत आहे. प्रत्येक वाहनांवरील हॉर्नला मर्यादा घालुन दिलेली आहे. मात्र काही हौसी वाहन चालक वाहनांवर कर्णकर्कश हॉर्न लावून बिनदिक्कतपणे वाहने चालवितात. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरात बहुतांश ठिकाणी आधीच होणारी वाहतुककोंडीमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांना कर्णकर्कश हॉर्नमूळे बेजार झाले आहेत
शांतता झोनमध्येही धुमाकूळ !
शहरातील शाळा-महाविद्यालये, रुग्णालय व इतर शांतता झोन परिसरात सर्रास ध्वनीच्या मर्यादेचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे शहरातील शांतता झोन केवळ नावापुरतेच शिल्लक उरले असुन रुग्णालय परीसरातील रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

