अमळनेर प्रतिनिधी: पंकज पाटील पारोळा आज ता. ३ जानेवारी रोजी वसंतनगर ता. पारोळा येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेत भारतातील पहिल्या शिक्षिका
मुख्याध्यापिका, समाजसेविका, कवयित्री, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिमापूजन, गावात मिरवणुकीचा कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष देशमुख जाधव यांच्या मार्गदर्शनाने सावित्रीमाई फुले यांचा सजीव देखावा तयार करीत घोड्यावर सर्व गावात मिरवणूक काढण्यात आली. इयत्ता नववी, दहावी व जुनिअर कॉलेजच्या विध्यार्थिनींनी साडया व डोक्यावर भगवा फेटा परिधान करीत ढोल, ताशाच्या गजरात लेझिम खेळीत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते. गावातल्या चौका-चौकात लेझिमच्या नृत्याने महिला मुक्ती दिवसाचा आनंद साजरा करण्यात आला.गावात मिरवणूकीनंतर शाळेच्या पटांगणात सावित्रीमाईच्या प्रतिमेला सामूहिक आदरांजली देण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती एल. एस. पाटील तर मुख्याध्यापक सोपान पाटील, जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, एम. डी. सूर्यवंशी, डी. एस. पाटील, के. आर. पाटील, बी. पी. पाटील, आर. सी. चौधरी, डी. एम. बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी इयत्ता दहाविच्या विध्यार्थिनींनी सावित्रीमाई, महात्मा जोतिरावं फुले यांच्या जीवनावर स्त्री शिक्षणावर आधारीत नाटिका सादर केली, तर पुजा विठ्ठल जाधव या विध्यार्थिनीने मी सावीत्री बोलतेय हे एकपात्री नाटिका सादर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. एच. निकुंभे, सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील तर आभार जे.के. रायसिंग यांनी मानले.
दरम्यान सावित्रीमाई फुले जन्मोत्सव, महिला मुक्ती दिवस, बालिका दिवस कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थीनींनी घेतलेला सहभाग, लेझिम पथक, घोड्यावरील मिरवणूक, मी सावित्री बोलतेय एकपात्री प्रयोग, महात्मा जोतिराव फुले, सावीत्री माई फुले यांच्या स्त्री शिक्षणावरीलजीवन यांचा हुबेहूब नाटिका सादर केल्याने येथील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.


