चोपडा पोलीस वृत्त- अनवर्दे येथील स्वप्नील केशव पाटील (वय २७) शिंदखेडा येथील सुलवाडे बॅरेज येथे सापडला. मयत स्वप्नील पाटील हा दिनांक २८ रोजी सांयकाळी ५.०० वा च्या सुमारास घोडगाव, कुसुंबे येथील मित्रांना भेटण्यासाठी मोटर साईकल क्रमांक एमएच १९ डीसी ४११० ने निघाला होता व दिनांक ३० रोजी दुपारी ३.०० वा च्या दरम्यान तापीनदी पात्रात सुलवाडे बॅरेज ता. शिंदखेडा जि. धुळे येथे त्याचे मृतदेह सापडला व मृतदेहाचे हात पाय हे बुटच्या लेसने बांधले होते व कमरेच्या पट्ट्याला लहान लाकडी काठी अडकवलेली होती. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास स. पो. नि.गोरावडे करत आहे.


