जळगाव (पोलीस वृत्त) शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा मंगळवार 9 ऑगस्टपासून सुरू होत आहे. आदित्य ठाकरे या दौऱयात जळगाव, पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिक, सिन्नर आणि भिवंडीतील जनतेशी संवाद साधणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील (west Maharashtra)शिवसंवाद यात्रेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. गद्दार आमदारांच्या मतदारसंघात तर झंझावातच निर्माण झाला होता. आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांच्या स्वागताला, सभेला होणारी प्रचंड गर्दी पाहून विरोधकांची छातीच दडपून गेली आहे. ही शिवसंवाद यात्रा (north Maharashtra) उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने रवाना होणार आहे.
शिवसंवाद यात्रेच्या कार्यक्रम आयोजन
मंगळवार 9 ऑगस्ट – सकाळी 11.30 वाजता पाचोरा, दुपारी 1.45 – धरणगाव, दुपारी 3 – पारोळा (एरंडोल), सायंकाळी 4.30 – धुळे आणि सायंकाळी 6 – मालेगाव
बुधवार 10 ऑगस्ट – दुपारी 12.30 – सिन्नर आणि सायंकाळी 4.15 – आंबाडी (भिवंडी ग्रामीण)

