चोपडा : पोलीस वृत्त न्युज – विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपून घरी परतणारे बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) दुचाकी अपघातात ठार झाल्याची घटना चोपडा (जि.जळगाव) येथे बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (४८) असे या ठार झालेल्या बीएलओचे नाव आहे. ते अनवर्दे खुर्द ता. चोपडा येथे शिक्षक आणि बीएलओ म्हणून कार्यरत होते. बुधवारी रात्री ते चोपडा येथून बभळाज ता. शिरपूर या आपल्या मूळ गावी दुचाकीने जात होते. त्याचवेळी समोरुन आलेल्या दुसऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यात ते ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा २१ रोजी बभळाज येथून निघणार आहे.