अमळनेर : पोलीस वृत्त न्युज – शासनाने मनाई केलेल्या अवैध गौण खनिज उपसा मंत्री अनिल पाटील यांनी सातत्याने सुरु ठेवला असून, शासनाचे कोट्यावधी रुपये मंत्री अनिल पाटील यांनी बुडवले आहेत. अनिल पाटील यांनी मौजे देवगाव ता अमळनेर जि जळगाव येथे गट नं 83 येथे अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक केल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना पत्रा द्वारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) नुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत शिरीष दादा मित्र परिवाराने सूतगिरणीचा विषय छेडून अनिल पाटील यांनी खाजवून खरुज काढली आहे असा प्रतिटोला लगावला आहे.
गेल्या पाच वर्षात विकासाच्या मुद्द्यावर एकही “चू” न, करणाऱ्या मंत्र्याला आता कसा विकासाचा पुळका आलाय गेल्या पाच वर्षात शाश्वत विकासाच्या नावावर निव्वळ गप्पा करणारा, अन बॅनरवरचा विकास करणारा, मंत्री आता जनतेच्या दारा दारात फिरत आहे. हीच जनतेची खरी ताकद आहे. गेल्या पाच वर्षात विकासाच्या मुद्द्यावर कधीही न चर्चा करणारे मंत्री महोदय, जनतेसाठी पाच वर्षात एकही आम सभा न घेणारे मंत्री आता प्रत्येक समाजाचा पाठिंबा घेऊन जणू मी निवडणूक जिंकून आमदार होणार असे भासवात आहेत. परंतु अमळनेर ची जनता सुज्ञ आहे. ती, खडी, माती, सिमेंट, खाणाऱ्या अन, अमळनेर तालुक्याला टक्केवारीत लुटणाऱ्याला त्यांची जागा दाखवणारच यात शंका नाही. असे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गुलाब पाटील यांनी बोलून दाखवले.
जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस
जळगांवचे जिल्हाधिकारी यांनी अनिल पाटील यांना नोटीस बजावली असून त्यांनी शासनाचा महसूल बुडवला आहे.त्यांनी इतरांवर खोटे आरोप करून नाक लावू नये. शासनाचे कोट्यावधीचे नुकसान करून जनतेची दिशाभूल करणारा मंत्री अमळनेर तालुक्यास नुकसानकारक असून, “लोका सांगे ब्रह्मज्ञान’ पण, स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी गत अमळनेर चे मंत्री अनिल पाटील यांची झाली आहे. गौण खनिज प्रकरणामुळे मंत्री अनिल पाटील का बोलत नाहीत? शिरिषदादा चौधरी यांनी सूतगिरणी प्रकरणी जे सत्य आहे ते स्पष्ट मांडून खुलासा केला. मंत्री असून गौण खनिज उपसा केला व शासनाला फसवले असा आमदार जो शासनाचे नुकसान करतो आणि जनतेची दिशाभूल करतो त्या आमदाराचे पुनर्वसन अमळनेर ची जनता करणार का??
असा सवाल डॉ. रविंद्र चौधरी यांनी विचारला आहे.
अनिल पाटील उत्तर द्या.. असे सरळ आव्हान डॉ रवींद्र चौधरी यांनी केले आहे.