अमळनेर: पोलीस वृत्त न्युज चाळीस वर्षात अमळनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा आमदार निवडून आलेला नाही, यंदा मात्र ही संधी चालून आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन ऍड ललिता पाटील यांनी केले आहे.
यंदा महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी डॉ. शिंदे आणि अमळनेरकर जनतेवर विश्वास दाखवला आहे. अमळनेर मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र चांगले संघटन असूनही गेली चाळीस वर्षे काँग्रेसचा उमेदवार ह्या मतदारसंघातून निवडून विधानसभेवर गेला नाही. मागे दोन वेळा ही संधी हुकली आहे. आता ह्या संधीचे सोने करायचे असून छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडू नका, हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलाने काम करून महाविकास आघाडीची ताकद दाखवून द्या, असे आवाहन ॲड ललिता पाटील यांनी महविकास आघाडीचे सर्व नेते, कार्यकर्ते, व पदाधिकारी यांना केले आहे.