जळगाव: पोलीस वृत्त न्युज – मतदार संघातील जनता आमच्यासोबत 100 टक्के आहे, तसेच त्यांचा आशिर्वाद ही आमच्या सोबत आहे, असा विश्वास व्यक्त करत जळगाव शहराचे भाजपचे उमेदवार आमदार सुरेश भोळे उर्फ राजू मामा यांच्या प्रचाराला जुने श्रीराम मंदिर पासून प्रचाराचे नारळ फोडून सुरुवात झाली आहे.

यावेळी खासदार स्मिता वाघ व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी माध्यमांशी बोलताना भाजपाचे उमेदवार श्रीरामाचे दर्शन घेऊन अशी प्रार्थना केली आहे की, राष्ट्राची व देशाची सेवा आमच्या हातून घडो गेल्या काळात युतीचे सरकार राज्यात होते. जनतेचे सेवक म्हणून आम्ही जनतेची अनेक कामे केलेली आहे. तसेच समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू ठरवून प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम या युती सरकारने केले आहे. याच कामांच्या जोरावर जनता आम्हाला आशिर्वाद देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षातील लोकांनी बंडखोरी केली यावर बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार आहे. ज्याला जनता आशिर्वाद देईल तोच निवडणूक येईल असेही ते यावेळी म्हणाले

