अमळनेर : पोलीस वृत्त न्युज – अमळनेर शहरात माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी आणि त्यांचे बंधू रवींद्र बापू चौधरी यांना प्रचार रॅली दरम्यान नागरिकांकडून मिळतोय उत्साही प्रतिसाद स्थानिक जनतेच्या समस्या निराधार राहिलेल्या नाहीत. या रॅलीत उपस्थित शेतकरी, व्यापारी, कष्टकरी आणि तरुणांनी विविध समस्यांवर चर्चा करून त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या, ज्यात गुंडागिरी, दुष्काळ, आणि पिक विमा यांचा समावेश आहे. अमळनेर शहरात गेल्या पाच वर्षांत गुंडागिरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गुंडागिरीमुळे सामान्य माणसाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे, अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पीक लागवडीचा विमा कोणत्याही कारणाशिवाय नाकारल्याने त्यांचे आर्थिक भविष्य धोक्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष वाढत चालला आहे. याबाबत ह्यां विधानसभेत जनतेने मागणी केली आहे की, शेतकऱ्यांच्या हक्कांप्रति जागरूकता निर्माण करणारा जनसेवक म्हणून शिरीष चौधरी यांना निवडून देने
अत्यावश्यक आहे.