अमळनेर : पोलीस वृत्त न्यूज– अमळनेर मतदार संघातील तिरंगी लढाई होणार असुन राज्याचे लक्षवेधनारी निवडणूक हि अमळनेर मधून होणारा असून उमेदवार कार्यकर्ते जोमाने प्रसाराला लागले आहे. ‘ताई, माई, आक्का विचार करा पक्का, नीट देखिसंन मारा शिक्का’ तर या निवडणुकीत कोण बाजी मारणार जनतेचा कौल काही कळेना अनेक कार्यकर्ते आपापल्या माध्यमातून प्रचार करतांना दिसतं आहे. तालुक्यात कोणत्या दिशेला कोणते चिंन्ह कोणता उमेदवार चालणार ही येनारी वेळ ठरवणार आज दिवाळीनिमित्त एका तरुणीने स्वतःच्या घराच्या दरवाज्याजवळ चक्क घड्याळाचे चित्र साकारले आहे. आणि घड्याळाची वेळ दर्शवली आहे. घड्याळ वेळेवरच राहील ‘राष्ट्रवादी’ पुन्हा येईल. असा नारा तरुणीने दिला आहे. सत्तेत असलेल्या मंत्री आ. अनिल पाटील पुन्हा निवडून येतील व आमदार होतील लाडक्या बहिणीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. याच सरकारने लाडक्या बहिणीचा विचार करा केला. आर्थिक मदत स्वरूपात का असेना खात्यावर वेळेवर पैसे मिळवून दिले. दिलेला शब्द पाळला याच पैशाने आज गोरगरीब जनतेची दिवाळी गोड झाली. म्हणुन यंदाची दिवाळी राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ रांगोळी स्वरूपात साकारून दिवाळी साजरा केली. अंगणातून प्रचार करताना दिसतं आहे. लक्षवेध ठरणारी रांगोळी तरुणीने (लाडक्या बहिणीने) साकारली आहे. (संपादक – रजनीकांत पाटील)


